भोपाळ - केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या झालेल्या अमानुष हत्येनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. उज्जैनमध्ये शुक्रवारी एका माहूताने आपल्या हत्तीणीसह महाकाल मंदिरात जात बाबा महाकालला हत्या झालेल्या हत्तीणीच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी यासाठी प्रार्थना केली.
गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा उज्जैनमध्ये अनोखा निषेध - pregnant elephant kill at kerala
विजयलक्ष्मी नावच्या या हत्तीणीने बाबा महाकालला आपल्या सोंडेने नमन केले, तर या हत्तीणीचा माहूत बबलू गुरू याने महाकालसमोर नतमस्त होत केरळमध्ये हत्या झालेल्या हत्तीणीच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी यासाठी प्रार्थना केली.
केरळच्या मल्लपूरममध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननसामधून फटाके खायला घलून तिची अमानुष हत्या करण्यात आली होती. हत्तीणीच्या अमानुषपणे केलेल्या हत्येमुळे देशभरात प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उज्जैनमध्येही या हत्तीणीच्या हत्येचा निषेध केला गेला. मुळात उज्जैन ही धार्मिक भूमी आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्ती पाहायला मिळतात. शुक्रवारी महाकाल मंदिराबाहेर एक माहूत आपल्या हत्तीणीला मंदिरात घेवून आला. विजयलक्ष्मी नावाच्या या हत्तीणीने बाबा महाकालला आपल्या सोंडेने नमन केले, तर या हत्तीणीचा माहूत बबलू गुरू याने महाकालसमोर नतमस्तक होत केरळमध्ये हत्या झालेल्या हत्तीणीच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी यासाठी प्रार्थना केली.