अकोला- शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीतील चार जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या या दुचाकींची किंमत 4 लाख 45 हजार इतकी आहे.
14 दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक; अकोला स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी - अकोला पोलीस न्यूज
स्थानिक गुन्हे शाखेने शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 45 हजार रुपये किंमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, पवन जनार्दन गव्हाळ आणि गुलजार शाह मिस्किन शाह या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर पवनने त्याचा साथीदार किशन शंकर बोरकर याचे नाव समोर आले. पवन आणि गुलजारकडून पोलिसांनी सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर चौकशी दरम्यान, गुलजार शाह याने कैलास धोपे याचे नाव सांगितले. पोलिसांनी या दोघांनाही अटक करत सात दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी एकूण चार लाख 45 हजारांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुळकर, सागर डोईफोडे, शंकर डाबेराव, अश्विन शिरसाट, फिरोज खान, रफिक, अब्दुल माजीद, मनोज नागमते, इजाज अहमद, रवी इरचे, संदीप ताले, रवी पालिवाल यांचा समावेश आहे.