महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पुणे : खेड तालुक्यात कोरोना स्वॅब तपासणीआधीच दोघांचा मृत्यू

खेड तालुक्यातील दोन जणांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत होती. त्यातील एकाचे स्वॅब घेऊन त्याला तपासणीकरिता पुण्याच्या औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा राजगुरुनगर येथे उपचारासाठी घेऊन येत असताना स्वॅब घेण्याआधीच मृत्यू झालाची माहिती पंचायत समिती सभापतींनी दिली.

कोरोना स्वॅब तपासणीआधीच दोघांचा मृत्यू
कोरोना स्वॅब तपासणीआधीच दोघांचा मृत्यू

By

Published : May 27, 2020, 11:16 AM IST

पुणे - कोरोना रुग्णांच्या संपर्कातील खेड तालुक्यातील दोघांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यातील एकाचे स्वॅब घेऊन त्याला पुण्यातील औंध रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तपासणी अहवाल येण्याआधीच त्याचा आज (बुधवार) पहाटे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, दुसरा राजगुरुनगर येथे उपचारासाठी घेऊन येत असताना स्वॅब घेण्याआधीच मृत्यू झालाची माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

जिल्ह्यातील खेड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. यामध्ये मुंबईवरून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा असून आतापर्यंत 15 रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना पुण्यातील औंध रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले व कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या 11 जणांचे रिपोर्ट आज येणार आहेत.

खेड तालुक्यात पुणे, मुंबई परिसरातून येणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे मुंबईवरून येणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आजारांबाबत जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने तपासणी करावी. जेणेकरून कोरोनाचा समूह संसर्ग वाढणार नाही, असे आवाहन सभापती अंकुश राक्षे यांनी केले आहे.

वाडा येथील तरुणाचा अचानक मृत्यू

मुंबईवरून खेड तालुक्यातील वाडा परिसरात एक तरुण पाच दिवसांपूर्वी आला होता. त्याला काही प्रमाणात त्रास होत असल्याने त्याच्यावर वाडा येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घेऊन जात होते. वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या घशातील स्वॅब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details