सांगली -जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले. हे दोघेही मुंबईहून आले असून यामध्ये शिराळा तालुक्यातील एक तर मिरज मधील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 49 वर पोहोचली आहे.
मुंबईहून परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 49वर - corona numbers in sangli
जिल्ह्यात आणखी दोन नवे कोरोना रुग्ण आढळल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49 झाली आहे. आजपर्यंत 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 112 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहीती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात रविवारी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये शिराळा तालुक्यातल्या मणदूर येथील 81 वर्षीय वृद्ध आणि मिरजेच्या मालेगाव रोडवरील 67 वर्षीय एका व्यक्तीचा समावेश आहे. मणदूर येथील वृद्ध हा मुंबईतील त्याच्या कोरोनाबाधित मुलाच्या संपर्कात आला होता. तर, मिरजेच्या मालगावरोडवरील दत्त कॉलनी येथील व्यक्ती हा 27 मे रोजी मुंबईहून चौघांसमवेत एका रुग्णवाहिकेमधून मिरजेत पोहचला होता. त्यानंतर त्याला क्वारंटाइन करून त्याचे स्वॅब चाचणीकरता घेण्यात आले होते. या चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल हा रविवारी सकाळी आला आहे. या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आणखी दोन नवे कोरोना रुग्ण आढळल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49 झाली आहे. आजपर्यंत 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 112 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहीती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे..