धुळे- जिल्हा रुग्णालयात एकूण 46 कोरोना संशयितांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यापैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 294 झाली आहे.
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 294 वर - धुळे कोरोना बातमी
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी 46 पैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 294 वर जावून पोहेचली आहे. तर आतापर्यंत 131 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी 46 पैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 294 वर जावून पोहेचली आहे. तर आतापर्यंत 131 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात शहरात 13 तर ग्रामीण भागात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, उर्वरित 136 अॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील मृत्युदर 9 टक्क्यांवर गेला असून उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा मृत्यू दरात 3 ऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना बधितांची संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यातील व्यवसाय तसेच जनजीवन पूर्वपदावर येत असताना वाढती रुग्ण संख्या ही चिंताजनक ठरली आहे, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.