महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

येवल्यात 2 कोरोनाबाधित दगावले...मृतांचा आकडा 6 वर - कोरोना बातमी नाशिक

आज दुपारी नव्याने आलेल्या अहवालांमध्ये 5 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात एकाच कुटुंबातील चार जण असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याच पाच बाधितांमध्ये एका 6 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे.

येवला कोरोना
येवला कोरोना

By

Published : Jun 13, 2020, 8:16 PM IST

नाशिक - येवल्यात आज (शनिवार) पुन्हा 2 कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला असून आत्तापर्यंत तालुक्यात एकूण 6 जणांचा बळी गेला आहे. दोन्ही रुग्णांवर नाशिक शहरात उपचार सुरू होता. आज दुपारी नव्याने आलेल्या अहवालांमध्ये 5 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात एकाच कुटुंबातील चार जण असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याच पाच बाधितांमध्ये एका 6 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. येवल्यात आज दिवसभरात सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सायंकाळी आलेल्या अहवालात 35 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला आहे. दिवसेंदिवस येवल्यात कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असून आत्तापर्यंत येवला तालुक्यात एकूण 62 रुग्ण हे कोरोना बाधित असून त्यातील 45 जण हे कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहे. सध्या अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण संख्या ही 16 असून आतापर्यंत कोरोनामुळे तालुक्यात 6 जणांचा बळी गेला आहे.

बाभुळगाव येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात 29 संशयित दाखल असून 90 जण होम क्वारंटाईन आहेत. एकूणच पाहता येवल्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मृतांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसत असल्याने येवला शहरासह ग्रामीण भागातील जनतेत भीती पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details