यवतमाळ - जिल्ह्यात आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात एक पुरुष (50) आणि एका महिलेचा (40) समावेश आहे. आज(गुरुवार) पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोन्हीही व्यक्ती नेर येथील आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 36 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह 47 जण भरती आहेत. यात 11 केसेस प्रिझमटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आणखी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 162 वर - यवतमाळ कोरोना रुग्णसंख्या
गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 22 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी दोन पॉझिटिव्ह तर 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 162 झाली आहे. तर, उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 124 असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला गत 24 तासात 22 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे आले आहेत. महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 2 हजार 589 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2 हजाल 581 प्राप्त तर, 8 रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 162 वर गेली आहे. यापैकी सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 36 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत. तर, उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 124 असून जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून 2 हजार 419 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.