महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नांदेडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच; मंगळवारी २४ रुग्णांची भर - कोरोना रुग्णसंख्या नांदेड बातमी

नांदेडमध्ये मंगळवारी २४ नवे रुग्ण आढळले असून एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. शहरात दररोज नवीन कंटेन्मेंट झोन निर्माण होत असून ही नांदेडकरांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरूच
नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरूच

By

Published : Jun 16, 2020, 7:38 PM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून यात मंगळवारी एकाच दिवशी २४ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. दररोज ही संख्या झपाट्याने वाढत असून ही संख्या ३०० च्या जवळ येऊन ठेपली आहे. त्यात मुखेड तालुक्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नांदेडमध्ये मंगळवारी २४ नवे रुग्ण आढळले असून एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. शहरात दररोज नवीन कंटेन्मेंट झोन निर्माण होत असून ही नांदेडकरांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

बँकेतील एका कर्मचाऱ्यामुळे अनेकजण संक्रमित -

महावीर चौक भागात असलेल्या बँकेतील एका कर्मचाऱ्याला झालेली लागण वेगाने पसरली आहे. अगोदर बँकेचे अनेक कर्मचारी व त्यानंतर आता काही कर्मचाऱ्यांचे कुटुंब कोरोनाबाधित झाले आहे. हा आकडा आणखी वाढणार की थांबणार, हे सांगणे तूर्त तरी अवघड आहे.

आज सापडलेले रुग्ण या भागातील आहेत -

- शिवविजय कॉलनी - ४
- सोमेश कॉलनी - ४
- श्रीकृष्णनगर - २
- दीपनगर - १
- चिखलवाडी - १
- परिमलनगर - १
- विशालनगर - १
- बरकतपुरा - १
- फरांदेनगर - १
- एमजीएम परिसर - १
- मुखेड - ६
- सेलू - १

ABOUT THE AUTHOR

...view details