महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांना बैरुतमधील स्फोट हा 'हल्ला' असल्याचे वाटते - ट्रम्प - लेबेनॉन स्फोट न्यूज

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी बैरुत (लेबेनॉन) येथे झालेला स्फोट हा भयंकर हल्ला होता, असे म्हटले आहे. तसेच, हा बॉम्ब हल्ला असल्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती आपल्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारले की, त्यांनी हा हल्ला असल्याचे का म्हटले? अपघात असल्याचे का नाही? खासकरून, आतापर्यंत लेबनीज अधिकाऱ्यांनीही अद्याप या स्फोटाचे निश्चित कारण काय आहे, याविषयी काही वक्तव्य केलेले नाही.

बैरुत स्फोट न्यूज
बैरुत स्फोट न्यूज

By

Published : Aug 5, 2020, 5:42 PM IST

वॉशिंग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी बैरुत (लेबेनॉन) येथे झालेला स्फोट हा भयंकर हल्ला होता, असे म्हटले आहे. तसेच, हा बॉम्ब हल्ला असल्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती आपल्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. या स्फोटात आतापर्यंत 100 हून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर, तीन हजारांहून अधिक जण जखमी आहेत.

ट्रम्प यांना विचारले होते की, त्यांनी हा हल्ला असल्याचे का म्हटले? अपघात असल्याचे का नाही? खासकरून, आतापर्यंत लेबनीज अधिकाऱ्यांनीही अद्याप या स्फोटाचे निश्चित कारण काय आहे, याविषयी काही वक्तव्य केलेले नाही. असे असताना ट्रम्प यांनी या दुर्घटनेला बॉम्ब स्फोट का म्हटले, असे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी विचारले होते.

त्यावर ट्रम्प यांनी आपल्या लष्करी जनरल्सना भेटल्याचे सांगितले. या जनरल्सना हा बॉम्ब स्फोट असल्याची दाट शक्यता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. ‘त्यांना वाटते की हा हल्ला आहे. हा एक प्रकारचा बॉम्ब होता,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, ट्रम्प यांनी पीडितांसाठी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अमेरिका लेबनॉनला मदत करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले, ‘हा एक भयंकर हल्ला असल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले.’ याविषयी पेंटॅगनच्या प्रवक्त्याला मंगळवारी रात्री विचारले असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

स्फोटामुळे बंदराचा बराच भाग सपाट झाला आणि राजधानीत इमारतींचे नुकसान झाले. तसेच, स्फोटामुळे धुराचा मोठा ढग तयार होऊन यामुळे आकाशात एक मोठे मशरूमचे तयार झाले आहे. तसेच, मृतांसह जवळपास तीन हजार लोक ढिगाऱ्यांखाली सापडले आहेत, असे लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितले.

या स्फोटाचे कारण ताबडतोब सापडले नाही. मात्र, सुरुवातीला आलेल्या अहवालांमधून बंदरावरील एका वेअरहाऊसमध्ये आग लागल्याचे सांगण्यात आले. लेबनीज सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख अब्बास इब्राहिम यांनी काही काळापूर्वी जहाजाने मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ आणल्याचे आणि बंदरावर साठवले असल्याचे सांगितले. यामुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. अमोनियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनी एलबीसीने दिली आहे.

येथील प्रत्यक्षदर्शींनी नारंगी रंगाचा मोठा ढग आणि नायट्रोजन डायॉक्साइड सारखे विषारी वायू या स्फोटानंतर दिसल्याचे सांगितले. यामध्ये वेगवेगळ्या नायट्रेट्सचाही समावेश होता.

सध्या लेबनॉनची अर्थव्यवस्था कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे कोसळण्याच्या स्थितीत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच, त्यांच्या बचतीचे पैसे अक्षरशः मातीमोल झाले आहेत. कारण डॉलरच्या तुलनेत त्यांच्या चलनाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले आहे. यामुळे अनेक लोक दारिद्र्यात फेकले गेले आहेत.

शिवाय याच काळात इस्रायल आणि हिज्बुल्लाह दहशतवादी संघटनेदरम्यान संघर्षाची स्थिती आहे. हा दहशतवादी गट लेबेनॉनच्या दक्षिणेकडील सीमेवर आहे.

या स्फोटामुळे लेबेनॉन मधील अंतर्गत संघर्षादरम्यान झालेल्या भयानक स्फोटांचे आठवणी जाग्या झाल्या. असा एक स्फोट संयुक्त राष्ट्र समर्थन दिलेल्या एका लवादाच्या निर्णयाच्या केवळ तीन दिवस अगोदर झाला होता. 15 वर्षांपूर्वी झालेल्या या स्फोटात लेबेनॉनचे माजी पंतप्रधान रफिक हारिरी मारले गेले होते. एका ट्रक बॉम्ब त्यांना संपवले होते. या ट्रकमध्ये एका टनाच्या आसपास स्फोटक पदार्थ ठासून भरलेले होते. याचा आवाज अनेक मैलांपर्यंत ऐकू गेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details