मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईत शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. तसेच, 90 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, कोरोनाचे 1 हजार 372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 हजार 357 वर तर, मृतांचा आकडा 2 हजार 42 वर पोहोचला आहे. मुंबईत आतापार्यंत 25 हजार 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने सध्या 28 हजार 163 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक मृतांची नोंद, आकडा 2 हजार पार; 1372 नवे रुग्ण
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 55357 वर पोहचला आहे. त्यापैकी 2042 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईत आतापर्यंत 25152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 28163 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात शुक्रवारी काही प्रमाणात घट दिसून आली आहे. तर, कोरोनाचे नव्याने 1 हजार 372 रुग्ण आढळून आले आहेत. तर 90 जणांचा मृत्यू झाला आहे. 90 मृतांपैकी 65 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 65 पुरुष आणि 25 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 6 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 46 जणांचे वय 60 वर्षावर तर, 38 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईत शुक्रवारी 943 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 25 हजार 152 वर पोहचला आहे.