नांदेड - शुक्रवारी आलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 222 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 170 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 112 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात दिलासादायक बातमी म्हणजे, दररोज मृत्यूची संख्या वाढत असताना शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद नाही.
शुक्रवारी प्राप्त झालेल्या एकुण 1 हजार 352 अहवालापैकी 1 हजार 171 अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार 170 एवढी झाली असून यातील एकूण 13 हजार 909 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सद्या जिल्ह्यातील एकुण 2 हजार 710 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 63 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. तर उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 83.69 टक्के आहे. शुक्रवारी एकाही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही तर जिल्ह्यातील मृतांची संख्या एकूण 448 वर गेली आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 46, हिमायतनगर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 4, हदगाव तालुक्यात 1 , मुखेड तालुक्यात 3, हिंगोली 1 असे एकुण 58 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 51, लोहा तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 8, भोकर तालुक्यात 1, उमरी 1, अर्धापूर तालुक्यात 4, मुखेड तालुक्यात 15, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 7, किनवट तालुक्यात 12, धर्माबाद तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 2, परभणी 3, यवतमाळ 1 असे एकूण 112 बाधित आढळले आले.
जिल्ह्याची आतापर्यंतची कोरोना संशयित व बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 91 हजार 20
निगेटिव्ह स्वॅब- 70 हजार 564
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 170