पुणे-शहरात आज (30 मे) दिवसभरात 108 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर 194 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे कोरोनामुळे दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात दिवसभरात 108 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 8 रुग्णांचा मृत्यू
पुण्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6201आहे. एकूण मृत्यू ३०९ असून आजपर्यंतच एकूण ३६४४ इतक्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य अधिकारी आणि नेतेमंडळी कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करतात
सध्या पुणे शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2248 इतकी आहे. त्यातले 170 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 6201आहे. एकूण मृत्यू ३०९ असून आजपर्यंतच एकूण ३६४४ इतक्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.