यवतमाळ - मागील आठवड्यापासुन रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या आणि मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी एकाच दिवशी चार बधितांचा मृत्यू झाल्याने पुन्हा जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेक झाल्याचे चित्र दिसत आहे.
यवतमाळ : कोरोना मृत्यूचे सत्र पुन्हा सुरू; शुक्रवारी चार जणांचा मृत्यू - यवतमाळ कोरोना अपडेट
जिल्हात मागील चोवीस तासांमध्ये चार कोरोना बधितांचा मृत्यू झाला. तर नव्याने 96 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर 44 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली.
जिल्हात मागील चोवीस तासांमध्ये चार कोरोना बधितांचा मृत्यू झाला. तर नव्याने 96 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर 44 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आज मृत झालेल्या चार जणांमध्ये यवतमाळ शहरातील 74 वर्षीय तर यवतमाळ तालुक्यातील 79 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष आणि 75 वार्षीय महिलेचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 611 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9016 झाली आहे. यापैकी सात हजार 808 रुग्ण बरे झाले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 288 मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत 79 हजार 790 नागरिकांचे नमुने पाठवले असून यातील 78 हजार 854 नमुने प्राप्त झाले. तर 936 नागरिकांचे नमुने अद्यापही बाकी आहेत. यामध्ये एकूण 69 हजार 838 नागरिकांची नमुने आतापर्यंत निगेटिव आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.