सातारा- लोक विनाकारण बाहेर फिरत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू ठेवावीत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज दिला आहे. आदेश 31 जुलैपर्यंत लागू राहणार आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दुकानांच्या वेळेत बदल - Corona virus satara
जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये कार्यक्रमास जिल्ह्याबाहेरील वधू-वर, वधू-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहीण, सख्खे आजी-आजोबा यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बाजारातील दुकानांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 ही वेळ देण्यात आली होती. तथापि, गेल्या दोन आठवड्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या व लोकांचे विनाकारण घराबाहेर रेंगाळणे, यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा दुकानांच्या वेळेवर निर्बंध आणले आहेत. जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्येच चालू राहतील. कन्टेन्मेंट झोनमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांचे आदेश लागू राहतील.
जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी असून यामध्ये कार्यक्रमास जिल्ह्याबाहेरील वधू-वर, वधू-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहीण, सख्खे आजी-आजोबा यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.