श्रीगंगानगर - हिंदूमलकोटच्या लगत असलेल्या भारत-पाक पंजाब सीमेवरून जिल्ह्यात विना परवानगी आलेल्या तिघांना पोलिसांंनी ताब्यात घेतले.( DL- 9 CU 6021) क्रमांकाच्या गाडीमधून एक महिला आणि 2 तरुणांना कोठा पूल चेक पोस्ट जवळील हिंदूमलकोट पोलिसांनी थांंबवून चौकशी केली. या वेळी त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता हे तिघेही इराणचे नागरिक असल्याचे समोर आले.
भारत-पाक सीमेवरून इराणचे तीन संशयित नागरिक पोलिसांच्या ताब्यात - भारत-पाक सीमा परदेशी नागरिक
एक महिला आणि 2 तरुणांना कोठा पूल चेक पोस्ट जवळील हिंदूमलकोट पोलिसांनी थांंबवून चौकशी केली. या वेळी त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे तिघेही इराणचे नागरिक असल्याचे समोर आले.
three-suspected-iranian-civilians-detained-near-indo-pak-border-hindumalkot-sri-ganganagar
आंतरराष्ट्रीय सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग हे तिघे नागरीक विनापरवाना पार करत होते. कोणताही विदेशी नागरिक विनापरवाना हा महामार्ग पार करू शकत नाही. त्या नंंतर गुप्त पोलिसांकडे त्यांना अधिक चौकशी करता ताब्यात देण्यात आले आहे.