नागपूर - पाचशे किलो लोखंड चोरी प्रकरणात मध्य रेल्वेच्या कार्यालय अधीक्षकासह तिघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. राजकुमार निखारे असे या अधीक्षकाचे नाव आहे. तो अजनी येथे रेल्वे वाहतूक विभागात कार्यरत आहे. आरपीएफच्या या कारवाईमुळे रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली खडबड आहे.
रेल्वेचे लोखंड चोरून ते भंगारात विकल्या प्रकरणात रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना अटक - अजनी रेल्वे स्टेशन न्यूज
पाचशे किलो लोखंड चोरी प्रकरणात मध्य रेल्वेच्या कार्यालय अधीक्षकासह तिघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. या प्रकरणात आरपीएफने १२ हजार ५०० रुपयांचे पाचशे किलो लोखंडी पाइप जप्त केले आहेत. रेल्वे कार्यालय अधीक्षक, त्याचा खासजी सुरक्षा रक्षक आणि भंगार खरेदी करणाऱ्या दुकानदाराला आरपीएफने अटक केली आहे.
या प्रकरणात आरपीएफने १२ हजार ५०० रुपयांचे पाचशे किलो लोखंडी पाइप जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ते लोखंड दिघोरी परिसरातील एका दुकानात विकले होते. भंगारच्या नावाखाली रेल्वेचे लोखंड विकत घेणाऱ्या दुकानदारालाही आरपीएफने अटक केली आहे. या शिवाय या प्रकरणात खासगी सुरक्षा रक्षक सुरेश पेठे यालाही अटक करण्यात आली आहे.
आरोपी राजकुमार निखारे याने सुरेश पेठे याच्या मदतीनेच रेल्वेचे लोखंड भंगारच्या दुकानात विकल्याचे समोर आले आहे. आरपीएफने तिघांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. तपासात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.