नवी मुंबई - पनवेल महापालिका क्षेत्रात आज (शुक्रवार) ३० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, महापालिका क्षेत्रात ३५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये खारघरमधील ९ कामोठ्यातील ८, कळंबोलीतील ४, पनवेलमधील ३, तळोजा येथील ३, नवीन पनवेलमधील २, तसेच खांदा कॉलनीतील एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण ८९१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २३८ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.