नागपूर - शुक्रवारी एका दिवसात नागपुरात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 ने वाढली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नागपुरात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी काही प्रमाणात रुग्ण संख्येला ब्रेक लागल्याचे आकड्यांवरून दिसून येत आहे.
नागपुरात एकाच दिवसात कोरोना रुग्ण संख्येत १६ ची वाढ: एकूण रुग्ण संख्या ९३९
शुक्रवारी नव्याने 16 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची 939 एवढी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण आधीपासूनच संस्थात्मत विलगिकरणात होते. आज ज्या नवीन रुग्णांची वाढ झाली आहे त्यामध्ये मोमीनपुरा, बांग्लादेश, चांद्रमनी नगर सह सावनेर तालुक्यात राहणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे.
आज (शुक्रवारी) नव्याने 16 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची 939 एवढी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण आधीपासूनच संस्थात्मत विलगिकरणात होते. आज ज्या नवीन रुग्णांची वाढ झाली आहे त्यामध्ये मोमीनपुरा, बांग्लादेश, चांद्रमनी नगर सह सावनेर तालुक्यात राहणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात 5 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरातील कोरोनाबाधितांची संख्या 542 इतकी झाली आहे. तर आता पर्यंत 15 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या 382 रुग्णांवर मेयो, मेडिकल आणि एम्स या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.