महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 130 वरुन 30 वर, बरे होण्याचे प्रमाण 69 टक्के - ratnagirib latest corona news

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. सोमवारीपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 69 टक्के इतके आहे. तर गृह विलगीकरणात असलेल्या आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 80 हजार नागरिकांचा 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून जिल्ह्याची कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यासारख्या रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांमुळे ही संख्या पुन्हा वाढली आहे.

ratnagiri corona news
ratnagiri corona news

By

Published : Jun 15, 2020, 6:32 PM IST

रत्नागिरी - कोरोनाबाधित रूग्ण आढळलेल्या परिसरास प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेंमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात येते. जिल्ह्यात अशा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता 130 वरून 30 वर आली आहे. यात चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक 12 क्षेत्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ही अगोदरच 130 वरून 48 वर आली होती. राहिलेल्या एकूण 48 पैकी 18 गावांचा 14 दिवसांचा कालावधी सोमवारी संपला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात 48 गावातील एकूण 4309 घरे असून 16991 नागरिक या क्षेत्रात आहेत. 12 आरोग्य पथकांमार्फत या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यानंतर ही संख्या आता घटताना दिसत आहे. सुरुवातीला 130 पर्यंत असणारी प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता जवळपास 80 ने कमी झाली आहे. परंतू नव्या क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तेथे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. सोमवारीपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 69 टक्के इतके आहे. तर गृह विलगीकरणात असलेल्या आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 80 हजार नागरिकांचा 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून जिल्ह्याची कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल आहे. मात्र, मुंबई आणि पुण्यासारख्या रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांमुळे ही संख्या पुन्हा वाढली आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे, तर संशयित कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील तब्बल 18 झोनचा 14 दिवसांचा कालावधी संपल्याने एकूण झोनची संख्या महिनाभरात तब्बल 100 ने कमी झाली आहे.

14 दिवसांचा प्रतिबंधित क्षेत्र कालावधी संपलेल्या गावांची नावे -

चिपळूण तालुका -तिवडे, कामथे, धामणवे, खेर्डी, दोनवली, कुटरे.

संगमेश्वर - निवे बुद्रुक, पांगरी.

दापोली - बांधतिवरे, आंजर्ले, मुगीज,

लांजा -रुण, वेरवली, प्रभानवल्ली, खावडी.

गुहागर -वरचा पाट, वरवेली. खेड-खोपी.

ABOUT THE AUTHOR

...view details