महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची खैर नाही, जागेवरच होणार कोरोना टेस्ट - corona-test-will-be-held-on-the-spot

ही. कारण कोणी रस्त्यावर फिरताना दिसले तर त्याची तेथेच कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

Nanded
Nanded

By

Published : Apr 12, 2021, 10:29 PM IST

नांदेड: नांदेडमध्ये आता विनाकारण फिरणाऱ्यांची खैर नाही. कारण कोणी रस्त्यावर फिरताना दिसले तर त्याची तेथेच कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

...तर थेट कोविड केअर सेंटरमध्ये होणार रवानगी

महानगरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणीवर भर दिला. आता विविध भागात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशिर कारवाईसाठी सहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दोषीविरुध्द जागेवरच आर्थिक दंड आकारण्यासाठी हे पथक उद्यापासून (13 एप्रिल) महानगरात कार्यरत होणार आहे. अशा व्यक्तींमध्ये कुणाबद्दल जर शंका आली तर त्या व्यक्तींची तात्काळा कोरोना टेस्ट करुन त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये रवाना केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

म्हणून फिरणे टाळा…

भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार यापूर्वी काढलेल्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे टाळून स्वत: व आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होणार नाही यांची काळजी घ्यावी, आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथकात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details