महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

11 महिन्यांच्या चिमुकलीचे आई-वडील कोरोनामुक्त, 21 दिवसांनी भेटल्यानंतर आनंदाश्रू - ठाणे चिमुकली न्यूज

आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यापासून त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीची ताटातूट झाली. ते बरे होईपर्यंत 21 दिवस आपल्या चिमुकलीचा सांभाळ केल्याबदद्दल तिच्या कुटुंबाने सर्वांचे आभार मानले. एकीकडे कोरोनामुळे माणूस माणसाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असताना दुसरीकडे माणुसकीचे दर्शन या निमित्ताने ठाण्यात घडले.

ठाणे लेटेस्ट न्यूज
ठाणे लेटेस्ट न्यूज

By

Published : Jun 5, 2020, 7:20 AM IST

Updated : Jun 5, 2020, 7:44 AM IST

ठाणे -कोरोना विषाणूच्या महामारीत माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना ठाण्यात पाहायला मिळाली. संपूर्ण कुटूंब कोरोनाशी लढत असताना सुदैवाने 11 महिन्यांच्या त्यांच्या मुलगीची चाचणी निगेटिव्ह आली होती. अशा वेळी तिला घरच्यांसोबत ठेवणे शक्य नव्हते. तब्बल 21 दिवस तिचा सांभाळ दुसऱ्या एका कुटुंबाने केला. तिचे आई-वडील कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान भावनिक वातावरण पाहायला मिळाले.

मुंबई येथे राहत असलेले एक कुटुंब गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह आले होते. मात्र, त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली नसल्याने तिचा सांभाळ आता कोण करणार, असा प्रश्न पडला होता. ठाण्यातील युवा सेनेचे कार्यकर्ते राहुल लोंडे यांनी त्वरित ही बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. शिंदे यांनी आपले कार्यकर्ते बाळा मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रीना मुदलियार यांना या चिमुकलीचा सांभाळ करण्यास सांगितले. तब्बल 21 दिवस या 11 महिन्यांच्या चिमुकलीचा मायेने सांभाळ करण्यात आला.

आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्या या चिमुकलीचा सांभाळ केल्याबदद्दल तिच्या कुटुंबाने सर्वांचे आभार मानले. एकीकडे कोरोनामुळे माणूस माणसाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असताना दुसरीकडे माणुसकीचे दर्शन या निमित्ताने ठाण्यात घडले. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे वेळोवेळी त्या चिमुरडीच्या तब्बेतीची विचारपूस करत होते. तिला कुटूंबापासून दूर असल्याची जाणीव होऊ दिली नाही.

11 महिन्यांच्या त्या मुलीचे आई-वडील कोरोनाला हरवून परतल्यानंतर तिला घेण्यासाठी आले होते. यावेळी दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. दरम्यान या चिमुकलीचा पहिला वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.

Last Updated : Jun 5, 2020, 7:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details