रायगड -येथील मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवसागणिक अपघाताच्या घटना घडत आहे. सध्या कडक उन्हाच्या झळा बसत असल्याने त्याचा महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांवर परिणाम होत आहे. अनेक वाहनांमध्ये बिघाड होऊन आग लागण्याच्या घटना ही सर्वाधिक आहेत. यातच रविवारी दुपारी पुणे बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ मदत करून ही आग आटोक्यात आणली.
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टेम्पोला अचानक आग - Tempo burning news
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुणे बाजूकडून मुंबईकडे टेम्पो सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान प्रवास करीत असताना पुणे लेनवर आला.
![रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टेम्पोला अचानक आग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-06:18:10:1620564490-mh-rai-04-accident-slug-mhc10085-09052021174538-0905f-1620562538-75.jpg)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुणे बाजूकडून मुंबईकडे टेम्पो सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान प्रवास करीत असताना पुणे लेनवर आला. यावेळी या टेम्पोने (क्र. MH.02.ER.3194) अचानक पेेेट घेतला.
ही बाब चालकाच्या तत्काळ लक्षात आल्याने सावधानता बाळगत स्वत:चा जीव वाचविण्यासाठी गाडी सुरक्षित उभी करून गाडीतून तत्काळ बाहेर पडून ही आग विझविण्यासाठी आरडाओरडा करीत मदतीचा हात देत असताना महामार्ग पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, देवदूत यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदत केली आणि येथील वाहतूक थांबवून आग आटोक्यात आणली. या आगीत टेम्पोचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. तर चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.