मुंबई: काही दिवसांपासून मुंबईत उन्हाळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मुंबईकर टोपी, गॉगलचा वापर करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर उन्हाळा आणि युवा पिढीत खेळल्या जाणाऱ्या प्रसिद्ध पब्जी गेमचा फायदा व्यावसायिकांनी लचलला आहे. या गेमवर आधारित टोपीच बाजारात विक्रीस आणण्यात आली आहे. त्याचबरोबर 'अपना टाईम आऐगा' असे लिहिलेल्या टोपींचीपण मागणी वाढली आहे.
मुंबईत उन्हाचा कडाका वाढला उन्हापासून डोळ्याचे आणि डोक्याचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्स अणि टोप्यांच्या मागणीला दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे व्यावसायिक सांगतात.
मुलांच्या आवडीच्या मोबाईल पब्जी , छोटा भीमसह मेरा भी वक्त आयेगा अशी नावे असलेल्या टोप्यांची विक्री जास्त प्रमाणात आहे. या टोप्यांच्या किंमती 50 रुपये ते 300 रुपयापर्यत आहेत. दिवसाला 50 ते 100 टोप्या सहज विकल्या जातात, असे दादर येथील टोपी विक्रेते नरेश यांनी सांगितले.
उन्हाळ्यात अशी घ्यावी काळजी -
उष्माघातापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला सतर्क आणि काळजी घेणं आवश्यक आहे. घराबाहेर पडताना काळ्या कपड्यांचा वापर टाळला पाहिजे. सुती आणि हलके कपडे यांचा वापर करावा, दिवसात जास्तीत पाणी प्यायलं पाहिजे. डोक्यावर रुमाल, टोपी व छत्रीचा वापर करावा.