महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

तेजश्री आणि मंगेशने गुढी उभारून केले 'जजमेंट' सिनेमाचे प्रमोशन - Mangesh Desai

गुढी पाडव्याचा सण जरी उद्या असला तरी गुढी उभारून जजमेंट सिनेमाच्या प्रमोशनची झाली सुरुवात...तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाईने केली गुढीची पुजा...या सिनेमात तेजश्री वकिलाच्या भूमिकेत आहे तर मंगेश खलनायक साकारणार आहे...

तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाईने केली गुढीची पुजा

By

Published : Apr 5, 2019, 4:46 PM IST


मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याद्वारे होते. या सणानिमित्त अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचा मुहूर्त आपल्याला मिळतो. सिनेमाच प्रमोशन ही देखील त्यातलीच एक गोष्ट.. यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने जजमेंट सिनेमाच्या टीमने गुढी उभारून प्रमोशनचा श्रीगणेशा केला.

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता मंगेश देसाई यांनी मस्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून गुढीची विधिवत पूजा केली. त्यानंतर सगळ्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देऊन सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली.

गुढीपाडव्याचा सण म्हटलं की अनेक जुन्या आठवणी ताज्या होणं सहाजिकच आहे. यानिमित्ताने तेजश्रीने डोंबिवलीतील घरी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाचं वेगळेपण सांगितलं तर मंगेश मुळचा औरंगाबादचा त्यानेही मराठवाड्यात गुढीपाडवा कसा साजरा होतो याच्या काही आठवणी सांगितल्या

जजमेंट या सिनेमात तेजश्री एका वकिलाच्या भूमिकेत आहे, तर मंगेश हा एका खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. समीर सुर्वे दिग्दर्शित हा सिनेमा माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या एका कथेवर आधारित आहे.

येत्या 24 मे रोजी हा सिनेमा रिलीज होत असला तरीही खास गुढीपाडव्याच्या निमित्ताने या दोघांनी आमचे प्रीतिनिधी विराज मुळे यांच्यासोबत मस्त संवाद साधला आहे. पाहुयात त्यांच्या पाडव्याच्या आठवणी नक्की काय आहेत ते...

'जजमेंट' सिनेमाच जोरदार प्रमोशन

ABOUT THE AUTHOR

...view details