महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आवाजाच्या तपासणीवरून केवळ 37 सेकेंदात शोधता येणार संशयित कोरोना रुग्ण - Nesco Covid Center news

‘व्हॉईस बायो मार्कर आर्टीफिशियल इंटेलीजन्स’ ही पद्धती नक्की उपयोगी आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका पुढे आली असून नेस्को कोविड सेंटर यावर रिसर्च करणार आहे. यासाठी उद्या शनिवारी अमेरिकेतील एका कंपनीशी करार होणार आहे.

संशयित कोरोना रूग्ण न्यूज
संशयित कोरोना रूग्ण न्यूज

By

Published : Aug 7, 2020, 10:04 PM IST

Updated : Aug 8, 2020, 7:51 AM IST

मुंबई - कोरोनाचे निदान जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर उपचार मिळून रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी आधी अशा संशयित रुग्णांना आधी शोधणे गरजेचे आहे. यासाठी सध्या स्क्रिनिंगसारखे पर्याय वापरले जात आहेत. मात्र, आता लवकरच यात आणखी एका नव्या पर्यायाची भर पडण्याची शक्यता आहे. तर, ‘व्हॉईस बायो मार्कर आर्टीफिशियल इंटिलीजन्स’ असे या पर्यायाचे नाव आहे. म्हणजेच नागरिकांच्या आवाजावरून त्यांच्यात कोविडचे लक्षणे आहेत का? हे तपासता येणार आहे. त्यातून संशयित रूग्ण शोधणे सोपे होणार आहे आणि तेही केवळ 37 सेकंदांत.

‘व्हॉईस बायो मार्कर आर्टीफिशियल इंटेलीजन्स’ ही पद्धती नक्की उपयोगी आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका पुढे आली असून नेस्को कोविड सेंटर यावर रिसर्च करणार आहे. यासाठी उद्या शनिवारी अमेरिकेतील एका कंपनीशी करार होणार आहे.

इस्त्राईल आणि अमेरिकेत ‘व्हॉईस बायो मार्कर आर्टीफिशियल इंटेलिजन्स’चा वापर सुरू आहे. तर, आता भारतात याचा वापर करण्यासाठी रिसर्च अर्थात अभ्यास केला जात आहे. त्यात आता मुंबई महापालिकाही पुढे आली आहे. अमेरिकेतील एका कंपनीने पालिकेशी यासाठी संपर्क साधला होता. त्यानुसार, आता ही पद्धती योग्य आणि उपयोगी आहे का, यासाठी अभ्यास करण्यात येणार आहे. ही कंपनी नेस्कोतील 2 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि चंदीगडमधील 8 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास करणार आहे. करार झाल्याबरोबर नेस्कोमध्ये या प्रयोगाला सुरवात होईल, अशी माहिती नेस्को सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंध्राडे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे.

मोबाईल अ‌ॅपवर रुग्णांना 50 ते 70 असे आकडे मोजायला सांगत त्यांचा आवाज तपासला जाणार आहे. या अ‌ॅपवरून अवघ्या 37 सेकंदात त्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे सौम्य, मध्यम वा गंभीर आहेत का, हे समजेल. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करत लवकरात लवकर निदान होईल नि वेळेत उपचार मिळतील, असे हे संशोधन आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हा अभ्यास पूर्ण होईल आणि त्यानंतरच ही पद्धती योग्य, उपयोगी आहे का, हे सिद्ध होईल नि मगच मुंबईत याचा वापर होईल, असेही डॉ. आंध्राडे यांनी सांगितले आहे.

Last Updated : Aug 8, 2020, 7:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details