महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सर्वोच्च न्यायालय - श्रीसंतच्या बंदीसंदर्भात बीसीसीआयच्या लोकपालांनी ३ महिन्यात घ्यावा निर्णय - सर्वोच्च न्यायालय

बीसीसीआयने श्रीसंतवर घातलेल्या बंदीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बंदीबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते.

एस.श्रीसंत

By

Published : Apr 5, 2019, 11:04 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांतच्या बंदीसंदर्भातील निर्णय लोकपाल डी. के. जैन यांच्याकडे सोपविला आहे. यासंदर्भात 3 महिन्यांत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

बीसीसीआयने श्रीसंतवर घातलेल्या बंदीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बंदीबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते.

न्यायाधीश के. एम. जोसेफ आणि न्यायाधीश अशोक भुषण यांच्या खंडपीठाने, बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांना श्रीशांतच्या शिक्षेबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. बीसीसीआयकडे शिस्तपालन समिती कार्यरत नसल्याने लोकपाल डी. के. जैन याबाबत निर्णय घेणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details