बीड - लोकसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या गोटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. केज विधानसभा मतदारसंघातील विजय केंद्रे यांच्या पाठोपाठ प्रदिप भांगे यांनी आता राष्ट्रवादीचा हात धरला आहे. प्रदिप भांगे हे महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेचे राज्य सचिव आहेत. भांगेंच्या राष्ट्रवादीत जाण्याने भाजपची बाजू कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपचा परंपरागत मतदार पक्षावर नाराज, ऊसतोड मजूर संघटनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा - loksabha
गोपीनाथ मुंडे यांनी तीस वर्ष ऊसतोड मजुरांच्या बळावर राजकारण केले. बीडमधील ऊसतोड मजूर भाजपचा हक्काचा मतदार समजला जात असे. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊसतोड मजूर बीडमध्ये आहेत. त्यांची संख्या ७ लाख असल्याचे सांगितले जाते. ऊसतोड मजुरांच्या संघटनेने भाजपची साथ सोडल्याने भाजपला याचा फटका बसेल असे सांगितले जात आहे.

मंगळवारी सकाळपासूनच प्रदीप भांगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे पत्र सोशल मीडियावर फायनल झाले होते. त्याची मोठी चर्चादेखील बीड जिल्ह्यात झाली. या लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे बीडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.