नवी दिल्ली- आज भारत चीन यांच्यात पूर्वी लडाख येथे पाचवी सेनापती स्तरीय चर्चा होणार आहे. ती घ्यायची की नाही, याची खातरजमा करून घेण्यासाठी चीनी सैन्याकडून (पीएलए) काल उशिरा रात्री भारतीय समकक्ष अधिकाऱ्यांना अचानक फोन लावण्यात आला होता. अचानक फोन करण्यामागे सूत्रांनी दोन कारणे सुचविली आहे. एक तर चीनी सैन्य दिवस किंवा लष्करी तत्वज्ञानी सन त्झू यांचे तत्वज्ञान.
सूत्रांच्या माहितीनुसार, एक तर सैन्य दिवसाच्या तैयारीत चीनी सैन्य गुंतलेले असणार, त्यामुळे कदाचित अचानक फोन केला असणार किंवा तत्वज्ञानी त्झू यांच्या सांगण्याप्रमाणे शत्रू जेव्हा हल्ल्याच्या अपेक्षेत नसणार व तो युद्धासाठी तैयार नसणार, तेव्हा हल्ला करायचा, या तत्वाचे चीनी सैन्य पालन करत असणार. त्यालाच अनुसरून काल अचानक भारतीय सैन्याला बैठकीची तारीख ठरवण्यासाठी चीनी सैन्याकडून फोन लावण्यात आला असावा. चीनी सैन्याकडून उशिरा रात्री अचानक फोन येणे, हे काही नेहमीसारखी क्रिया नाही, अशी माहिती सैन्यातील एका सूत्राने दिली आहे.