पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल व मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. त्या मतमोजणी व निकालाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरात कोणत्याही नागरिकाला अधिकृतपणे प्रवेश दिला जाणार नाही. तसेच विजयी उमेदवारांना रॅली, विजयी मिरवणूक काढणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
मतमोजणी केंद्रांच्या आवारात अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश -
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 2 मेला लागणार आहे. त्या मतमोजणी केंद्रावर अधिकृत पासधारक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. मतदान केंद्र परिसरामध्ये ही कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. त्याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अधिक प्राधिकृत पासधारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात 144 कलम लागू..