महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

एक वर्षानंतर स्मिथ-वॉर्नर दिसले क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जर्सीत, मैदानावर केला कसून सराव - undefined

डेव्हिड वॉर्नरने मात्र यंदाच्या आयपीएल सीजन चांगलेच गाजविले त्याने ७०० पेक्षा जास्त धावा केल्या. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना १ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

स्मिथ-वॉर्नर

By

Published : May 5, 2019, 3:01 PM IST

ब्रिस्बेन - डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ ही फलंदाजांची जगातील सर्वात हिट जोडी म्हणून ओळखली जाते. विश्वचषकात धमाल करण्यासाठी ते दोघेही सज्ज झाले आहेत. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी कंबर कसली आहे. १३ महिन्यांच्या अवधीनंतर ते काल पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या जर्सीत दिसून आले.


रविवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ब्रिबेन येथे विश्वचषकाच्या तयारीसाठी सराव सुरू केला आहे. जस्टिन लँगरच्या मार्गदर्शानाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला होता. यात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांचाही सहभाग होता. दोघांनीही रविवारच्या दिवशी कसून सराव केला. यावेळी स्टीव स्मिथ कव्हर ड्राईव्हचा फटका मारण्याचा सराव करत होता.

स्टीव स्मिथ अॅडम जॅम्पा, नॅथन लॉयन मिचेल स्टार्कस, सीम एबॉट आणि मिशेल नसर यांच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव केला. आयपीएलमध्ये त्याला चमक दाखविता आली नाही. डेव्हिड वॉर्नरने मात्र यंदाच्या आयपीएल सीजन चांगलेच गाजविले त्याने ७०० पेक्षा जास्त धावा केल्या. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना १ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details