पेण (रायगड) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एसटीची सेवा बंद करण्यात आली होती. अखेर मंगळवारी (दि.9 जून) लालपरी पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. यासंदर्भातील माहिती रायगड विभागाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
अखेर रायगडमध्ये 'लालपरी' धावली
दरम्यान, सामाजिक अंतराच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुनच ही एसटीची सेवा सुरू करण्यात आली आहे. रेल्वे व इतर वाहन सेवा बंद असल्याने एसटीने सुरु केलेल्या बस सेवेला फार महत्त्व आले आहे. यामुळे शेकडो कर्मचारी आपल्या कामावर पुन्हा हजर होऊ शकणार आहेत.
जिल्ह्यात अलिबाग-पनवेल मार्गावर 9, पनवेल-अलिबाग मार्गावर 9, पेण-पनवेल मार्गावर 12 तर पनवेल-पेण मार्गावर देखील 12 फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर कर्जत-पनवेल मार्गावर 12, पनवेल-कर्जत मार्गावर देखील 12 फेऱ्या कर्जत-खोपोली मार्गावर तसेच खोपोली-कर्जत मार्गावर प्रत्येक दोन-दोन फेर्या, खोपोली-पनवेल आणि पनवेल-खोपोली मार्गावर प्रत्येकी 10-10 फेर्या सुरु करण्यात आल्या आहेत.