अकोला - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज (मंगळवारी) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कोविड केअर सेंटरला भेट दिली. त्यांनी तेथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच बच्चू कडू यांनी प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांची पाहणीही केली.
राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड केअर सेंटरला भेट; कोरोना रुग्णांशी साधला सवांद - dr. panjabrao deshmukh agri university
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कोवीड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढणऱ्या रूग्णांचीही आस्थेने चौकशी केली आणि प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.
![राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड केअर सेंटरला भेट; कोरोना रुग्णांशी साधला सवांद akola news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:56-mh-akl-06-palkmantri-visit-quarantine-centre-7205458-02062020203214-0206f-1591110134-222.jpg)
पालकमंत्री कडू यांनी ज्या-ज्या विभागांच्या समन्वयातून रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष विचारणा करुन त्यांच्या समोरच उपचारासाठी दाखल रूग्णांची विचारपूस करुन खात्री केली. यावेळी महापलिकेने दाखल केलेले रुग्ण, तसेच सौम्य लक्षणे असणारे रुग्ण, नमुने घेऊन अहवालांच्या प्रतिक्षेत असणारे रुग्ण यांसाठी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थांची पाहणी त्यांनी केली. रुग्णांना देण्यात येणारे जेवण, भोजन गृह, तसेच त्यांच्या दैनंदिन स्वच्छतांची व्यवस्था याबाबतही पाहणी करून रुग्णांकडूनही त्याची माहिती घेतली.
दरम्यान, यावेळी त्यांच्या समवेत विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, नोडल अधिकारी शेळके तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.