कोलंबो - श्रीलंकन संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने रविवारी सकाळी नशेत गाडी चालवत एका कारला धडक दिली. या अपघातात समोरील कारचा ड्रायव्हर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी करुणारत्नेला पोलिसांनी अटक केली. ही घटना श्रीलंकन वेळेनुसार ५. ४० मिनिटांनी झाली.
श्रीलंकन कसोटी कर्णधार करुणारत्नेला अटक, नशेत चालवत होता कार - sri lanka test captain dimuth karunaratne arrested for drunken driving
दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन संघाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी ड्रायव्हरची प्रकृती स्थिर आहे. ही घटना बोरेला येथे घडली. करुणारत्नेला जामीनावर सोडण्यात आले आहे. पुढील आठवड्यात दिमुथ करुणारत्ने न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कर्णधाराच्या या कृत्यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्ड न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई करण्याची शक्यता आहे.
दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन संघाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकली होती. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठीही कर्णधार म्हणून त्याची निवड होणार, अशी चर्चा होती. या प्रकरणानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्ड काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
TAGGED:
dimuth karunaratne