हैदराबाद - श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन सध्या आयपीएलसाठी भारतात आला आहे. मुरलीधरन हैदराबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हैदराबादी डोसा खाताना मुरलीधरनचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर होत आहे ट्रोल - coach muttiah muralitharans
मुथय्या मुरलीधरनचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्वीटर यूजर्स हा फोटो ट्रोल करत आहेत.
हैदराबाद संघाचा खेळाडू श्रीवत्स गोस्वामीने त्याच्या ट्विटर हँडलवर मुरलीधरनचा डोसा खातानाचा फोटो शेअर केला आहे. फोटोत डोसा खाताना मुरलीच्या चेहऱयावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. श्रीवत्सने फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की, आज सकाळी नाश्त्याच्या वेळचे दृश्य यापेक्षा चांगले असूच शकत नाही. मुरली सर कसे डोस्यावर ताव मारत आहेत.
मुथय्या मुरलीधरनचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्वीटर यूजर्स हा फोटो ट्रोल करत आहेत. एका युजरने ट्विटरवर लिहिले आहे, की मुरलीधरनचा डोसा खाण्याची पद्धत आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, हे त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीसारखे आहेत.