महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

श्रीसंतला 'नच बलिए' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली ऑफर - श्रीसंत

यापूर्वी तो झलक दिखलाजा आणि खतरो के खिलाडी शोमध्ये काम केले होते.

एस. श्रीसंत

By

Published : Apr 3, 2019, 9:54 PM IST

मुंबई - भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याला रियलटी टीव्ही शो 'नच बलिए' कार्यक्रमात सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे. पण यावर श्रीसंतने अद्याप होकार दिलेला नाही. सामना फिक्सिंग प्रकरणी त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. आता या प्रकरणावर बीसीसीआयच्या अंतिम निर्णयाची तो वाट पाहत आहे.

श्रीसंत याबाबतीत माहिती देताना म्हणाला, निर्मात्यांनी मला कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी विचरणा केली आहे. मी अजून त्यांना निरोप दिला नाही. कारण मी बीसीसीआयच्या निर्णयाची वाट बघत आहे.

मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली आयपीएलमध्ये सामना फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घातलेल्या निर्णयावर पुनर्रविचार करण्यास बीसीसीआयला सांगितले होते.

श्रीसंत म्हणाला की, बीसीसीआयचा निर्णय कधीही येऊ शकतो. नच बलिए शो ३ ते ४ महिने चालू शकतो. त्यामुळे सध्या मी कुणालाही वेळ देऊ शकत नाही. यापूर्वी तो झलक दिखलाजा आणि खतरो के खिलाडी शोमध्ये काम केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details