मुंबई- एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद संदर्भातील आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी मुंबई उच्च न्यायालयात कोविड 19 च्या संक्रमणाचा धोका लक्षात घेता जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे.
जामिनासाठी सामाजिक कार्यकर्ता सुधा भारद्वाज यांची उच्च न्यायालयात याचिका - Social activist Sudha bharadwaj
उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाला कोविड 19 चे संक्रमण रोखण्यासाठी कारागृहात करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे.
सुधा भारद्वाज या सध्या मुंबईतील भायखळा महिला कारागृहात असून त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांनी या आगोदर विशेष न्यायालयात जामिनासाठी याचिका केली होती, ज्याला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. जेल प्रशासन व शासनाकडून विशेष न्यायालयाने अहवाल मागविल्यानंतर ही याचिका फेटाळण्यात आली होती. या नंतर सुधा भारद्वाज यांच्या तर्फे अॅड युग चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भायखळा महिला कारागृहात कोविड संक्रमण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसून, त्यामुळे उच्च रक्तदाब व मधुमेहाने त्रस्त असलेल्या सुधा भारद्वाज यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना तात्काळ जामीन मंजूर करावा, अशी मागणी केली आहे.
यावर उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाला कोविड 19 चे संक्रमण रोखण्यासाठी कारागृहात करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे.