महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

COVID- 19 : पुणे विभागात आतापर्यंत 6 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी - pune corona latest news

आज अखेर (3 जून) पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 704 झाली असून ॲक्टीव रुग्णांची संख्या ही 4 हजार 305 इतकी आहे. तर विभागात एकुण 499 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

pune corona news
six thousand corona patients have been cured so far at Pune division

By

Published : Jun 3, 2020, 8:24 PM IST

पुणे - संपूर्ण देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजला आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. यातही राज्यातील मुंबई आणि पुणे या महत्तवाच्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. असे असले तरीही कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. आज अखेर (3 जून) पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 704 झाली असून ॲक्टीव रुग्णांची संख्या ही 4 हजार 305 इतकी आहे. तर विभागात एकुण 499 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 233 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 8 हजार 303 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 4 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 10 आहे. तर एकूण 372 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 194 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 2 जूनच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 287 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 169, सातारा जिल्ह्यात 13, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 569 कोरोनाबाधित रुग्ण असून 223 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले असून ॲक्टीव रुग्ण संख्या 322 आहे. तर एकूण 24 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 1080 कोरोनाबाधित रुग्ण असून 463 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले असून ॲक्टीव रुग्ण संख्या 524 आहे. तर एकूण 93 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील कोरोनाबाधित 122 रुग्ण असून आतापर्यंत 68 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले असून ॲक्टीव रुग्णांची संख्या ही 50 आहे. तर एकूण 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 630 कोरोनाबाधित रुग्ण असून 225 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 399 आहे. कोल्हापूरमध्ये आतापर्यंत एकूण 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण 92 हजार 840 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 88 हजार 80 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 760 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 77 हजार 234 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 10 हजार 704 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details