वाशिम - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी (16 जून) दुपारी आणि सायंकाळी आलेल्या अहवालानुसार ६ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता ५५ झाली आहे. मंगळवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील एकाच कुटुंबातील ४१ वर्षीय पुरुष आणि १३ वर्षाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. एकूण आकडा ५५ वर - washim corona news
मंगळवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील एकाच कुटुंबातील ४१ वर्षीय पुरुष आणि १३ वर्षाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबईतील डोंबिवली येथून हे कुटूंब आले होते. या कुटुंबातील ४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील एका ३० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही महिला १३ जूनला कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील आहे.
दरम्यान, सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार माळीपुरा, कारंजा लाड येथील ३ व्यक्तींना कोरोन विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये दोन ३६ वर्षीय पुरुष आणि एका २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हे सर्वजण कारंजा शहरातील कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहेत.