नंदुरबार - जिल्ह्याचे कोरोना रुग्णांचे अर्धशतक पूर्ण झाले असून एकाच दिवशी सहा रुग्ण आढळून आले आहेत. तर गडदाणी येथील एका रुग्णाची कोरोना चाचणी तिसर्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्या 50 झाली आहे. यापूर्वी रुग्णांचे मुंबई कनेक्शन उजेडात आले होते. मात्र, आता बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या परिवारातील व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. या अधिकाऱ्याचे धुळे येथे येणे-जाणे असल्याचे समोर आले आहे.
बांधकाम विभागातील बाधित अधिकाऱ्याच्या परिवारातील सहा जणांना कोरोनाची लागण - नंदूरबार कोरोना न्यूज
तीन दिवसांपूर्वी बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या परिवारातील सहा जणांना आता कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काल हा अहवालात प्राप्त झाला. एकाच वेळी एका कुटुंबातील सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार दिवसांपासून संख्या वाढतेच आहे. तीन दिवसांपूर्वी बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या परिवारातील सहा जणांना आता कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काल आलेल्या अहवालात या सहा जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी एका कुटुंबातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या सहा रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून अशाच पद्धतीने बाधितांची संख्या वाढत राहिली तर, नंदुरबारही हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले होते. तरीही, हे बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी धुळे येथून ये-जा करीत होते. सुरुवातीला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या परिवाराला क्वारंटाइन करून नमुने घेण्यात आले होते. त्यांच्या परिवारातील तीन महिला, दोन युवक व एका बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व आधी बाधित झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. पॉझिटिव्ह आलेले चौघे नंदुरबारला असून दोन जण धुळे येथे असल्याची माहिती मिळाली. आता अहवाल प्राप्त होताच आरोग्य विभागाच्या पथकाने बाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.