नवी दिल्ली - अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेते सुनिल दत्त यांच्या वाढदिवशी जुन्या आठवनींना उजाळा दिला. सुनिल दत्त माझे प्रेरणा स्थान असल्याचे म्हणत त्यांनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली.
शत्रुघ्न सिन्हांकडून अभिनेते सुनिल दत्त यांच्या आठवणींना उजाळा - shatrughan sinha latest news
'अभिनेता, निर्माता, दिगदर्शक, राजकारणी आणि एक सर्वोत्तम व्यक्ती सुनिल दत्त यांच्या वाढदिवशी आदरांजली, असे ट्विट शुत्रुघ्न सिन्हा यांनी केले.
'अभिनेता, निर्माता, दिगदर्शक, राजकारणी आणि एक सर्वोत्तम व्यक्ती सुनिल दत्त यांच्या वाढदिवशी आदरांजली, असे ट्विट शुत्रुघ्न सिन्हा यांनी केले. सिन्हा यांनी सुरु केलेल्या अंमली पदार्थ आणि तंबाखु विरोधी अभियानाची आठवणही त्यांनी सांगितली. या अभियानावर सुनिल दत्त यांचा मोठा प्रभाव होता. सुनिल दत्त यांच्यापासून अनेकजण खुप काही शिकले, पण माझ्यासाठी ते तंबाखु आणि अमंली पदार्थ विरोधी अभियानातील प्ररेणास्थान होते, यासह ते माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातही प्रेरणा देत होते. त्यांना माझा प्रणाम, असे ट्विट शत्रुन्घ सिंन्हा यांनी केले.
अभिनेता संजय दत्त यांनेही वडील सुनिल दत्त यांच्यासोबतचा एक बालपणीचा फोटो ट्विटवरून शेअर केला आहे. 1950 च्या दशकात सुनिल दत्त यांनी अभिनेते पदाची कारकिर्द सुरु केली होती. मदर इंडिया, सुजाता, वक्त आणि पडोसन या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. मदर इंडिया चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान त्यांनी नर्गिस सोबत विवाह केला.