महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

शेन वॉटसनने घेतला मुलाचा इंटरव्ह्यू, जाणून घ्या - धोनीबद्दल काय म्हणाला - undefined

ज्युनिअर वॉटसनने धोनीचे मोठ-मोठे षटकार आणि त्याचे यष्टीरक्षण आवडत असल्याचे सांगितले.

शेन वॉटसन आणि त्याचा मुलगा विलियम

By

Published : Apr 25, 2019, 9:06 PM IST

चेन्नई- ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनला यंदाच्या आयपीएल मौसमात म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. या वर्षी त्याने ११ सामन्यांत २४३ धावा केल्या आहेत. गेल्या मौसमात त्याने ५५५ धावा कुटल्या होत्या. यात एका शतकाचाही समावेश होता. शेन वॉटसनने त्यांचा मुलगा विलियमचा इंटरव्ह्यू घेतला. यात त्याच्या मुलाला कोणता भारतीय खेळाडू आवडतो असे विचारल्यावर त्याने महेंद्र सिंह धोनीचे नाव घेतले आहे.

ज्युनिअर वॉटसनने धोनीचे मोठ-मोठे षटकार आणि त्याचे यष्टीरक्षण आवडत असल्याचे सांगितले. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी ताहिर आणि वॉटसन यांच्या मुलासोबत धोनीचा धावतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

शेन वॉटसनने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ९६ धावांची खेळी केली. हा सामना चेन्नईने ६ गडी राखून जिंकला. यंदाच्या आयपीएलमधील हे त्याचे पहिले अर्धशतक ठरले. या खेळीनंतर वॉटसनने टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details