डुबलिन- शाई होप यांच्या शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने त्रिकोणीय मालिकेत दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. होपने १०९ धावांची खेळी करत सलामीला खेळताना सलग चौथ्यांदा शतक ठोकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
होपने यापूर्वी आयर्लंडविरुद्ध खेळताना १७० धावांची खेळी केली. मागील वर्षी २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना ३ सामन्यांच्या मालिकेत शेवटच्या २ सामन्यात २ शतके ठोकली होती.
होपने ६ सामन्यात सलामीला येऊन फलंदाजी करताना ६५७ धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके लगावली आहे. त्यानंतरच्या उर्वरित ४ सामन्यात ४ शतके ठोकली आहेत.
होपने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विक्रमी धावा काढत जॉन कॅप्बेल (१७९) याच्यासोबत खेळताना सलामीला ३६५ धावांची भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात हा नवा विक्रम ठरला.
दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने विंडीजचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात होपच्या शतकाच्या जोरावर विंडीजने ९ बाद २६१ धावा केल्या होत्या. प्रत्युरात बांगलादेशने २ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. त्यात तमीम इकबाल ८०, सौम्य सरकार ७३, शाकिब अल हसन नाबाद ६१, मुश्फिकूर रहमान याने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले.