महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस, दीड महिने पुरेल इतका पाणीसाठा - Mumbai ponds water level increased

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही जून कोरडा गेल्याने तलाव कधी भरणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह पाणी पाणीपुरवठा करणार्‍या तलावातही जोरदार पाऊस सुरू असल्याने तलावांमध्ये वेगाने पाणीसाठा जमा होऊ लागला आहे.

Mumbai rain
Mumbai rain

By

Published : Jul 13, 2020, 6:27 PM IST

मुंबई - जून महिना कोरडा गेला असला तरी जुलैपासून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आज 3 लाख 39 हजार 67 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून हे पाणी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पुरणारे आहे. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात मुंबईकरांना दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार अशा 7 धरणांमधून दररोज 38 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी 150 दशलक्ष लिटर पाणी ठाणे जिल्ह्याला दिले जाते, तर 140 दशलक्ष लिटर पाण्याची मुंबईपर्यंत येताना गळती होते. उर्वरित पाणी सुमारे पावणे दोन कोटी नागरिकांना दररोज पुरवले जाते.

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही जून कोरडा गेल्याने तलाव कधी भरणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह पाणी पाणीपुरवठा करणार्‍या तलावातही जोरदार पाऊस सुरू असल्याने तलावांमध्ये वेगाने पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. ही संततधार अशीच सुरू राहिल्यास लवकरच मुंबईकरांसाठी वर्षभर पुरणारा पाणीसाठा जमा होणार आहे.

असा वाढला पाणीसाठा-

सातही तलावांमध्ये मिळून 6 जुलै रोजी 1 लाख 60 हजार 692 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता. हा पाणीसाठा दीड महिने पुरणारा होता. तर आता 13 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सातही तलावांमध्ये मिळून 3 लाख 39 हजार 67 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा 3 हजार 800 दशलक्ष लिटर पाणी पाहता हे पाणी पुढील तीन महिने म्हणजेच 13 ऑक्टोबरपर्यंत पुरणारे आहे.

13 जुलैचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

तलाव पाणीसाठा

मोडक सागर 45570

तानसा 32257

मध्य वैतरणा 45585

भातसा 198166

विहार 11878

तुळशी 5612

एकूण 339067

ABOUT THE AUTHOR

...view details