महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

एकाच चेंडूवर दोन पद्धतीने बाद झाला मनीष पांडे - Sanju Samson's Brilliance Sends Manish Pandey Packing In RR Vs SRH

मनीष पांडेला यापूर्वीच्या ७ सामन्यांत खास कामगिरी करता आली नाही. मात्र, मागील २ सामन्यात त्याने १४४ धावा केल्या. चेन्नईविरुद्ध नाबाद ८३ तर राजस्थानविरुद्ध ६१ धावांची खेळी केली.

एकाच चेंडूवर दोन पद्धतीने बाद झाला मनीष पांडे

By

Published : Apr 28, 2019, 5:52 PM IST

जयपूर- आयपीएलध्ये शनिवारी हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात हैरादबादकडून मनीष पांडेने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पण संघाला विजय देण्यात त्याचे हे अर्धशतक कामी आले नाही. विशेष म्हणजे याच सामन्यात तो एकाच चेंडूवर दोन पद्धतीने बाद झाला. या सामन्यात त्याने झळकावलेल्या अर्धशतकापेक्षा तो ज्या पद्धतीने बाद झाला त्याचीच चर्चा जास्त होत आहे.

हैदराबादच्या १५ व्या षटकात श्रेयस गोपाल गोलंदाजी करण्यास आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर मनीष पांडेने स्लिपमधून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. याचवेळी संजूने मनीषला चपळाईने यष्टीचीत करण्याचा प्रयत्न केला. मनीष पांडेला स्टम्प आउट देण्यात आले. त्याला आऊट देण्यापूर्वी तिसऱ्या पंचानी स्टम्प आउट पाहिले. यावेळी तो स्टम्प आउट होण्यापूर्वीच यष्टीरक्षकाकडून झेल बाद झाल्याचे त्यांना दिसून आले, यानंतर त्याला झेलबाद करण्यात आले.

मनीष पांडेला यापूर्वीच्या ७ सामन्यांत खास कामगिरी करता आली नाही. मात्र, मागील २ सामन्यात त्याने १४४ धावा केल्या. चेन्नईविरुद्ध नाबाद ८३ तर राजस्थानविरुद्ध ६१ धावांची खेळी केली. आधीच्या ८ सामन्यात त्याने १९८ धावाच केल्या. शनिवारी झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या ३६ चेंडूत आक्रमक अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार ठोकले. तरीही हा सामना हैदराबादला जिंकता आला नाही.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details