सोलापूर- भीमा नदीवर सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेले पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यासह तलाठी मूसाक काझी, कैलास भुसिंगे, प्रशांत शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या हल्ल्यात तहसीलदार वाघमारे यांच्यासह तलाठी काझी थोडक्यात बचावले आहेत.
सोलापुरात वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न - Sand excavation Bheema river
पंढरपुर तालुक्यातील सांगोला जॉकवेल परिसरातील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार व त्यांचे पथक गेले होते. तेथे वाळू घेऊन चाललेल्या नंबर प्लेट नसलेल्या एका वाहनाच्या चालकाने वाहन थेट तहसीलदार यांच्या पथकावर घालण्याचा प्रयत्न केला.
पंढरपूर तालुक्यातील सांगोला जॉकवेल परिसरातील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार व त्यांचे पथक गेले होते. तेथे वाळू घेऊन चाललेल्या नंबर प्लेट नसलेल्या एका वाहनाच्या चालकाने वाहन थेट तहसीलदार यांच्या पथकावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान असलेल्या तहसीलदार व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा बचाव केला. या हल्ल्यात तहसीलदार वाघमारे यांच्यासह पथकातील सहकाऱ्यांना कोणतीही दुखपत झालेली नाही.
घटनेची माहिती पंढरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस ठाण्यात अण्णा पवार, ग्याबना धोत्रे, भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे या वाळू माफियांविरोधात प्राणघातक हल्ला करणे, वाळूची चोरी करणे, असे गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.