चीन: भारताची पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी झालेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मजल मारली. दुसरीकडे भारताचा किदाम्बी श्रीकांत याचा अनपेक्षित पराभव झाल्याने स्पर्धेतून त्याचे आव्हान संपुष्टात आले.
सिंधूने सरळ गेममध्ये जपानची ताकाहाशी सयाकावर २८ मिनिटात २१-१४, २१-७ ने मात केली. सिंधूचा पुढचा सामना इंडोनेशियाची चोईरूनिसाविरुद्ध होणार आहे.
दुसरीकडे सायनाने चीनची हान युए हिला पराभूत केले. सायनाने पहिला गेम १२-२१ असा गमविल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. पुढील दोन्ही गेम सायनाने २१-११, २१-१७ अशा फरकाने जिंकले. सायनाचा पुढील सामना द. कोरियाच्या किम गा युनविरुद्ध होणार आहे.
पुरूष गटात किदाम्बी श्रीकांतचा पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. श्रीकांतचा इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रूस्तावितो याने १६-२१, २०-२२ अशा फरकाने पराभूत केले.