महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सचिनचा फॅन सुधीर चौधरीचा होणार सन्मान - sachin tendulkar fan sudhir gautam to get global sports fan award

यावेळी सुधीर चौधरीसोबत जगातील इतर ४ फॅन्सना सन्मानित करण्यात येणार आहे. लंडन येथे १४ जून रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे

सचिनचा फॅन सुधीर चौधरीचा होणार सन्मान

By

Published : Apr 9, 2019, 8:56 PM IST

नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठी फॅन कन्युनिटी 'इंडियन स्पोर्ट्स फॅन'ने इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषकात स्पोर्ट्स फॅन्सना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या फॅन्सना ग्लोबल स्पोर्ट्स फॅन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात सचिन तेंडुलकरचा फॅन्स सुधीर चौधरी याचाही समावेश आहे.

यावेळी सुधीर चौधरीसोबत जगातील इतर ४ फॅन्सना सन्मानित करण्यात येणार आहे. लंडन येथे १४ जून रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याचसोबत इमजिर्ंग स्पोर्ट्स फॅन्सचाही गौरव करण्यात येणार आहे. जे खेळाला फॅशन बनवून जगातील कोणत्याही ठिकाणी जाऊन भारतीय संघाचे समर्थन करीत असतात.

या कार्यक्रमाबाबत बोलताना सुधीर म्हणाला, मी गेल्या १८ वर्षांपासून भारतीय संघाचे समर्थन करत फिरतोय. यात त्याने ३१९ एकदिवसीय, ६६ कसोटी, ७३ टी-२०, ६८ आयपीएलचे सामने आणि ३ रणजी चषकाचे सामने पहिले आहेत. हा पुरस्कार देण्यात येणार असल्याने मला आनंद होत आहे. हा पुरस्कार मी सचिन तेंडुलकरला समर्पित करतो.

ABOUT THE AUTHOR

...view details