मुंबई - मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पंजाब विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रोहितची ३ महिन्याची मुलगी हसत आहे. या व्हिडिओत रोहित त्याच्या मुलीला स्पॅनिश शिकवत आहे.
त्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, स्पॅनिश लेसन अॅट थर्ड मंथ. मुय बिन. त्याने शेवटी लिहिले की, मुय बिन. त्याचा अर्थ खूपच छान. रोहितच्या या व्हिडिओला अनेकजण लाईक करत आहेत.
रोहितला मंगळवारी अवघड ठिकाणी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला फिजियो नितिन पटेल यांनी उपचारासाठी ड्रेसिंग रुममध्ये घेऊन गेले. त्यामुळे तो सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर संघाचे नेतृत्व किरेन पोलार्डने केले. रोहितच्या जागी सिद्धेश लाडला खेळण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकात मुंबईने पंजाबवर रोमांचक विजय मिळविला.