महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आयपीएलमध्ये गेल्या ३ वर्षांच्या इतिहासात 'या' खेळाडूने मारलेत सर्वाधिक षटकार - rishabh pant hits more sixes than andre russell and chris gayle in ipl since 2017

पंत २१०७ नंतर आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल यांच्यापेक्षाही सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.

ऋषभ पंत

By

Published : May 9, 2019, 2:01 PM IST

मुंबई - आयपीएलच्या १२ वर्षात अनेक विक्रम रचले गेले आणि तितकेच विक्रम मोडलेही गेले. बुधवारी दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा फलंदाज ऋषभ पंतने नवा विक्रम केला आहे. पंतने मागील ३ वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक षटकार मारले आहेत. याआधी हा विक्रम विंडीजच्या आंद्रे रसेल आणि ख्रिस गेलच्या नावावर होता.


पंत २१०७ नंतर आंद्रे रसेल आणि ख्रिस गेल यांच्यापेक्षाही सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. गेल्या ३ वर्षात त्याने ८७ षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर केकेआरचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने ८३ षटकार मारले आहेत. तर ७२ षटाकारासंह ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच एम.एस. धोनीनेही ६९ षटकार लगावले आहेत.


बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने चेंडू ७५ वेळा सीमापार धाडला आहे. या सीजनचा विचार केल्यास सर्वाधिक षटकार खेचण्यात आंद्रे रसेल पुढे आहे. त्याने १४ सामन्यात ५२ षटकार मारले आहेत. त्यानंतर ख्रिस गेल ३४, हार्दिक पंड्या २९, एबी डिव्हिलियर्स २६ तर ऋषभ पंतने २६ षटकार मारले आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details