नवी दिल्ली - दिल्ली कॅपिटल्स संघ रविवारी बंगळुरूच्या संघाचा १६ धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. या सामन्यात दिल्लीचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने २ झेल घेत नवा विक्रम रचला आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये २० झेल घेत नवा विक्रम केला आहे. सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टीरक्षकाच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे.
पंतने आयपीएल २०१९ मध्ये १५ झेल आणि ५ फलंदाजांना यष्टीचीत केली आहे. हा विक्रम आधी श्रीलंकेचा महान यष्टीरक्षक कुमार संगाकाराच्या नावावर होता. संगाकाराने २०११ च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जस संघाकडून खेळताना १९ झेल घेतले होते. नुकतेच झालेल्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये यष्टीरक्षक नुरूल हसन याने १९ झेल घेतले होते.